आज प्रसिध्दी माध्यमांचे महत्व अतिशय वाढत आहे. सामान्य माणसाचा आवाज सरकार पर्यत पोहचवण्याच काम प्रसिध्दी माध्यमे करत असतात. आता सामान्य माणुस आवाज उठवतो तो तरी कसा चर्चा करुन, मोर्चे काढुन, संप करुन. राजकिय पक्षही संप आणि मोर्चे याच मार्गाने सामान्य माणसाचे प्रश्न मांडतात. त्यांच्या या मोलाच्या कामगिरीची दखल म्हणावी तितकी घेतली जात नाही. उगाच पेपर मधे एक लहानशी बातमी येते. अशा प्रकाराने त्यांचा आवाजच एक प्रकारे दाबला जातो. माझ मन हे बघुन खुप व्यथित होत. त्यांचा हा आवाज बाहेर पडावा यासाठी प्रसिध्दी माध्यमांनी पाऊले उचलणे खुप गरजेचे आहे.
या समस्येवरील उपाय म्हणुन ’साप्ताहिक संप’ नावाचे एक साप्ताहिक सुरु करावे असा माझा विचार आहे. या दैनिकामधे शहरात येत्या आठवड्यात होणार्या संपांची सगळी माहिती मिळु शकेल. त्या संपाची वेळ, तारीख, संप/मोर्चा यामागील कारण, त्या संपातील प्रमुख नेत्यांची नावे अशी माहिती देण्यात येईल. त्याच बरोबर त्यामुळे होणारी वाह्तुकीची कोंडी, जनजिवनावर होणारा विपरीत परिणाम यावर लेख लिहिण्यात येतील. मोर्च्याची बातमी मिळताच पोलीस बांधव आपली ड्युटी तिथे नसावी यासाठी नियोजन करु शकतील. संप आणि मोर्चा यांची माहिती आधिच मिळाल्यामुळे ज्या लोकांना त्या समस्ये विरुध्द आवाज उठवायचा आहे ते तिथे पोहचतील आणि इतर लोक संपाचा मार्ग सोडुन पर्यायी मार्गाने आपल्या गाड्या वळवतील. पर्यायी मार्गाने आपल्या गाड्या वळवण्याची तसदी जे लोक घेणार नाहीत ते ही एक प्रकारे जनसामान्यांचे कल्याण करतील. कारण एकदा वाहतुकीत अडकल्यावर लोक गजरे, लहान मुलांची खेळणी यांची रस्त्यावरील विक्रेत्यांकडुन खरेदीही करतील. भिक मागत फ़िरणार्या गरीब मुलांना पैसे देऊन दानाचं पुण्यही मिळवतील.
जनतेचा आवाज कमी पडु नये म्हणुन जर मोर्च्याच्या आयोजकांना स्वयंसेवक हवे असतील तर ’साप्ताहिक संप’ त्यासाठी सदैव तत्परतेने मदत करेल. त्यासाठी मोर्च्याच्या आयोजकांना ’साप्ताहिक संप’ मधे "स्वयंसेवक हवे" अशा आशयाची एक जाहिरात द्यावी लागेल. त्या जाहिरातीत स्वयंसेवकाकडुन असलेल्या अपेक्षांची माहिती दिलेली असेल जसे निव्वळ घोषणा देणे, रस्ता रोको करणे, एखादी गाडी किंवा माणुस तोडणे!!! तुरुंगात जाण्याची तयारी, ही सेवा केल्यासाठी मिळणारा मेवा इत्यादी. ’साप्ताहिक संप’ ची ही सुविधा अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवुन देईल. जनतेचा आवाज बुलंद होईल. मोर्च्याच्या आयोजकांना आवाज पोहचवायला अनेक स्वयंसेवक मिळतील. ’साप्ताहिक संप’ मधील काही पानं हे केवळ शितपेय, पाण्याच्या बाटल्या विकणार्या कंपन्यांसाठी राखुन ठेवण्यात येतील. घोषणा देऊन थकलेले स्वयंसेवक, वाहतुकीत अडकुन पडलेले लोक, बंदोबस्तावर उभे राहुन विटुन गेलेले पोलिस अशा जनसामान्यांना शितपेय आणि पाणी यांचाच आधार असतो. अशा या जागोजागी होणार्या संपाच्या जागी पाणी आणि शितपेयांची विक्री करुन या कंपन्या करोडो रुपये कमवु शकतील. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालनाच मिळेल.
’साप्ताहिक संप’ ५ जिल्ह्यातुन प्रसिध्द करण्यात येईल. मुंबई आणि पुण्याच्या वाचकांसाठी खास सोय ६ महिन्याचे पैसे आधी दिल्यास १०% सुट!!! कारण या शहरांमधे जनसामान्यांची संख्या मोठी आहे आणि त्यांची सेवा हेच ’साप्ताहिक संप’ चे ब्रिद वाक्य आहे. वाचकांना साप्ताहिक मोफ़त घरी पोहचवण्यात येईल. जेव्हा ते मिळणार नाही तेव्हा आम्ही संपावर गेलो आहोत असे वाचकांनी समजावे!!!
Monday 3 August 2009
Subscribe to:
Posts (Atom)