Monday, 3 August 2009

साप्ताहिक संप

आज प्रसिध्दी माध्यमांचे महत्व अतिशय वाढत आहे. सामान्य माणसाचा आवाज सरकार पर्यत पोहचवण्याच काम प्रसिध्दी माध्यमे करत असतात. आता सामान्य माणुस आवाज उठवतो तो तरी कसा चर्चा करुन, मोर्चे काढुन, संप करुन. राजकिय पक्षही संप आणि मोर्चे याच मार्गाने सामान्य माणसाचे प्रश्न मांडतात. त्यांच्या या मोलाच्या कामगिरीची दखल म्हणावी तितकी घेतली जात नाही. उगाच पेपर मधे एक लहानशी बातमी येते. अशा प्रकाराने त्यांचा आवाजच एक प्रकारे दाबला जातो. माझ मन हे बघुन खुप व्यथित होत. त्यांचा हा आवाज बाहेर पडावा यासाठी प्रसिध्दी माध्यमांनी पाऊले उचलणे खुप गरजेचे आहे.

या समस्येवरील उपाय म्हणुन ’साप्ताहिक संप’ नावाचे एक साप्ताहिक सुरु करावे असा माझा विचार आहे. या दैनिकामधे शहरात येत्या आठवड्यात होणार्‍या संपांची सगळी माहिती मिळु शकेल. त्या संपाची वेळ, तारीख, संप/मोर्चा यामागील कारण, त्या संपातील प्रमुख नेत्यांची नावे अशी माहिती देण्यात येईल. त्याच बरोबर त्यामुळे होणारी वाह्तुकीची कोंडी, जनजिवनावर होणारा विपरीत परिणाम यावर लेख लिहिण्यात येतील. मोर्च्याची बातमी मिळताच पोलीस बांधव आपली ड्युटी तिथे नसावी यासाठी नियोजन करु शकतील. संप आणि मोर्चा यांची माहिती आधिच मिळाल्यामुळे ज्या लोकांना त्या समस्ये विरुध्द आवाज उठवायचा आहे ते तिथे पोहचतील आणि इतर लोक संपाचा मार्ग सोडुन पर्यायी मार्गाने आपल्या गाड्या वळवतील. पर्यायी मार्गाने आपल्या गाड्या वळवण्याची तसदी जे लोक घेणार नाहीत ते ही एक प्रकारे जनसामान्यांचे कल्याण करतील. कारण एकदा वाहतुकीत अडकल्यावर लोक गजरे, लहान मुलांची खेळणी यांची रस्त्यावरील विक्रेत्यांकडुन खरेदीही करतील. भिक मागत फ़िरणार्‍या गरीब मुलांना पैसे देऊन दानाचं पुण्यही मिळवतील.

जनतेचा आवाज कमी पडु नये म्हणुन जर मोर्च्याच्या आयोजकांना स्वयंसेवक हवे असतील तर ’साप्ताहिक संप’ त्यासाठी सदैव तत्परतेने मदत करेल. त्यासाठी मोर्च्याच्या आयोजकांना ’साप्ताहिक संप’ मधे "स्वयंसेवक हवे" अशा आशयाची एक जाहिरात द्यावी लागेल. त्या जाहिरातीत स्वयंसेवकाकडुन असलेल्या अपेक्षांची माहिती दिलेली असेल जसे निव्वळ घोषणा देणे, रस्ता रोको करणे, एखादी गाडी किंवा माणुस तोडणे!!! तुरुंगात जाण्याची तयारी, ही सेवा केल्यासाठी मिळणारा मेवा इत्यादी. ’साप्ताहिक संप’ ची ही सुविधा अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवुन देईल. जनतेचा आवाज बुलंद होईल. मोर्च्याच्या आयोजकांना आवाज पोहचवायला अनेक स्वयंसेवक मिळतील. ’साप्ताहिक संप’ मधील काही पानं हे केवळ शितपेय, पाण्याच्या बाटल्या विकणार्‍या कंपन्यांसाठी राखुन ठेवण्यात येतील. घोषणा देऊन थकलेले स्वयंसेवक, वाहतुकीत अडकुन पडलेले लोक, बंदोबस्तावर उभे राहुन विटुन गेलेले पोलिस अशा जनसामान्यांना शितपेय आणि पाणी यांचाच आधार असतो. अशा या जागोजागी होणार्‍या संपाच्या जागी पाणी आणि शितपेयांची विक्री करुन या कंपन्या करोडो रुपये कमवु शकतील. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालनाच मिळेल.

’साप्ताहिक संप’ ५ जिल्ह्यातुन प्रसिध्द करण्यात येईल. मुंबई आणि पुण्याच्या वाचकांसाठी खास सोय ६ महिन्याचे पैसे आधी दिल्यास १०% सुट!!! कारण या शहरांमधे जनसामान्यांची संख्या मोठी आहे आणि त्यांची सेवा हेच ’साप्ताहिक संप’ चे ब्रिद वाक्य आहे. वाचकांना साप्ताहिक मोफ़त घरी पोहचवण्यात येईल. जेव्हा ते मिळणार नाही तेव्हा आम्ही संपावर गेलो आहोत असे वाचकांनी समजावे!!!

Monday, 22 June 2009

Accounting love

बघताच त्याला मला future profit दिसला.
मनामधे demand curve upward गेला.
पटकन goodwill calculate करुन bill of exchange सुरु झाले.
त्याला पटवायला accounts tally व्हायला लागले.
Balance sheet tally होत नव्हतं तेव्हा balance suspense account ला transfer केला.
rectification of errors करुन suspense account close झाला.
जेव्हा आमच्या bill of exchange मधे येत होती third party तेव्हा तिचे account मीच close केले.
जेव्हा असायचे मी insolvent तेव्हा माझ्या liabilities त्याच्याच होऊन जायच्या.
प्रेमात आमच्या होत राहो फ़क्त appreciation नसावे कधिच तिथे depreciation.
जागा नाही आमच्या partnership firm मधे admission of partner ला retirement of partner जमणार नाही करायला.
आता मात्र मी average due date calculate करणार आहे माझ्या secret partner चं नाव disclose करणार आहे.

Monday, 25 May 2009

फ़िरता करंडक

अनेक मैदानी खेळाच्या स्पर्धेत फ़िरता करंडक देण्याची पद्धत असते. हा फ़िरता करंडक दरवर्षी जिंकणारा समुह घेउन जातो. फ़िरता करंडक हि अतिशय छान कल्पना आहे. असा करंडक देउन सहभागी संघांचा सन्मानही केला जातो आणि करंडकावरील दरवर्षीचा खर्चही वाचतो. पण जेव्हा ही कल्पना जेव्हा तुम्हाला मिळणा-या भेटिंना लागु पडेल तेव्हा कसं वाटेल?

आजकाल कोणालाही भेटायला जाताना भेटवस्तु नेण्याची एक पद्धत आहे किंबहुना भेटवस्तुची किंमत पाहुनच प्रेम ठरवलं जातं. अगदी १ वर्षाच्या मुलाचा वाढदिवस असुदे नाहितर आजोबांची पंच्याहत्तरी भेटवस्तु दिल्या घेतल्या जातात. एक काळ असा होता जेव्हा मिळणा-या भेटवस्तुंचं अप्रुप होतं. आज घरात खेळण्यानी भरलेली खोली असताना गावाहुन आजीने पाठविलेल्या भातुकलीच्या भांड्यांचं काय अप्रुप वाटणार? हे तर झालं न कळत्या लहान मुलांचं पण मोठी माणसं महिन्याला कितेक हजार कमवणारी "आमचं स्टेटस, आमची लेवल" अशा गोंडस शब्दांखाली भेटवस्तुंवर हजारो रुपये खर्च करतात. यातुनच साठत जातो प्रत्येक घरात भेटवस्तुंचा एक डोंगर. हा डोंगर मग घरातल्या माळ्यावर जागा बळकावतो. या डोंगरात अनेक वस्तु असतात जसे दिवाणखान्यात ठेवायचे शो-पिस, फोटो फ़्रेम, डिनर सेट्स असलं बरचं काही. आता या डोंगराचं करायचं काय हा घरातल्या करत्या बाई समोरचा मोठा प्रश्न असतो. मग या सगळ्या पहाडातल्या वस्तुंचा फ़िरता करंडक होतो. घरी मग कुळधर्माची सवाष्ण जेवायला आली कि तिला एखादा छानसा शो पिस दिला जातो तो अर्थातच भेटवस्तुंच्या डोंगरातुन शोधलेला असतो. डिनर सेट्स नव्या लग्न झालेल्या मुलीला हौशीने दिले जातात. घरी आलेली सवाष्ण, लग्न झालेल्या मुली यांच्या घरातही आधिच भेटवस्तुंचे डोंगर असतातच त्यात ही नवी भर पडल्यावर त्या तरी काय करणार बिचा-या! त्या ही सगळया नविन आलेल्या भेटी माळ्यावर टाकतात आणि मग "फ़िरता करंडक"! सगळ्या भेटी नविन सवाष्णीला नव्या व्यक्तिला देणे. असा फ़िरता करंडक चालुच रहातो.

आता हा "फ़िरता करंडक" व्हायला नको तर काय करायचे? सोपा उपाय "सरळ पैसे देऊन टाकायचे. त्यांचं काय काहीपण करता येतं." असा बोलणारा एक वर्ग असतो. पण जेव्हा जवळच्या नात्यातल्या लग्नात मानपानाची एक साडी मिळत नाही हातावर पैसे टेकवले जातात तेव्हा "काय हे रितच नाही आजकाल लोकांना" असंही बोलणारे हेच लोक असतात. लग्नासारख्या समारंभात तर वर आणि वधु यांच्या आई-वडिलांना मानपानाच्या नावाखाली डझनाहुनही जास्त साड्या आणि कपडे मिळतात. आता इतक्या कपड्यांच करायचं काय? जाऊ द्या पेटीत! पुढच्या मुलाच्या नाहितर मुलीच्या लग्नात आहेरात द्यायला उपयोग होईल. शेवटचं कार्य असेल घरातलं तर मग आहेतच कि जुन्या मैत्रिणींचे वाढदिवस, नातेवाईकांकडे असलेली कार्य! तिथेही आहेर द्यावा लागतोच. मग साड्यांचाही फ़िरता करंडक होतो. "वापरली नव्हती मी ती साडी, दिली तर काय फ़रक पडतो?" असे प्रश्न विचारले जातात. पण मनात काही वेगळचं असतं "कसलं फ़ालतू कापड आहे. असल्या टुकार साड्या मी नाही बाई नेसतं." ही मनातली वाक्य असतात.

अशा या फ़िरत्या करंडकाच्या नादात पैसा आणि भावना या दोन्ही गोष्टिंचा बाजार मांडला जातो. असा तुम्ही फ़िरवलेला करंडक परत तुमच्याकडे आला तर तुम्हाला परत मिळाला तर तुम्हाला कसं वाटेल? हा विचार करंडक फ़िरवण्याआधी नक्की करा...

Saturday, 23 May 2009

हातचं सोडुन

मी पुण्यात शिकायला असताना माझी खोली झाडायला पुसायला एक आजी यायच्या. त्या मातंग समाजातील होत्या. त्यांच्या बरोबर त्यांची १३-१४ वर्षाची नात सोनू असायची. ती पुणे महानगरपालिकेच्या शाळेत शिकायची. घरची परिस्थिती अतिशय गरीब असुनही ती अभ्यासात अतिशय हुशार होती.
एक दिवस तिची आजी कामाला आली नाही आणि त्यांनी सोनूला काम करायला पाठवलं. तेव्हा आमच्यात झालेला संवाद असा

मी: "काय ग, आज आजी नाही आली तुझी?"
सोनू: "नाही ताई, बर न्हाय तिला."
मी: "मग दवाखान्यात गेल्या होत्या का त्या?"
सोनू: "झोपली हाय घरी. उद्यापर्यंत पडेल आराम."
मी: "मग तु कशाला आलीस? परीक्षा आहे ना पुढच्या आठवड्यात?"
सोनू: "मग तुमचं काम कोन करणार?"
मी: "अभ्यास कर. कामाचं काय करायचं ते मी बघते. आजी काही रागवणार नाही तुला."
सोनू: "न्हाय ताई करु द्या काम मलाच. हातचं सोडून पळत्याच्या मागं कुठं जाऊ. हे काम जमलं न्हाय तर कोन इचारनार हाय मला. कितीबी शिकले तरी हे चुकणार न्हाय."

इतकं बोलुन ती कामाला लागली. मी काही मिनिटं स्तब्ध झाले. माझ्या मनात विचारांचं काहुर उठलं. "हातचं सोडुन पळत्याच्या मागे जाऊ नये" ही गोष्ट त्या १३-१४ वर्षाच्या मुलीला समजली होती पण आपण हा विचार कितीवेळा करतो. आपल्याला आयुष्यात काय हवं आहे? आपली सगळी धडपड चालू असते ती नेमकी कशासाठी?. आमची तरुण पिढी जी आज यशाची अनेक शिखरं गाठत आहे, ते आम्ही जगण्यातला खरा अर्थ विसरलो आहोत का? आज हा कोर्स उद्या अजुन नविन काहीतरी, असा करत एक दिशाहीन आयुष्य जगणारी अनेक लोक आपल्याला भेटतात. हातात असलेली सुख आपण सोडुन देतो. जवळच्या माणसांची काळजी करत नाही. केवळ हातात पैसा आहे म्हणुन एक भरकटलेलं आयुष्य जगणं चांगलं कि आहे त्यात समाधानी आणि आनंदी रहाणं चांगलं? हा विचार गरजेचा नाही का?.
हातचं सोडुन पळत्याच्या पाठी जाताना तेलही गेलं तुपही गेलं हाती राहीलं धुपाटणं अशी गत झाली तर चुक कोणाची? एका कविने लिहीलं आहे " साधं सोप आयुष्य साधं सोप जगावं, हसावस वाटलं तर हसावं रडावसं वाटलं तर रडावं". आयुष्यात हेच समजणं गरजेचं नाही का?

Friday, 10 April 2009

Love

"Love is not a commodity that you can buy after putting it to the test. It is not something that you can buy after consulting others. It is not sold in the market for money. When you see a man and your pulse starts racing, your blood begins to sing and you yearn to spend the rest of life only with him, sharing his joys and sorrows-that is love. It is irrepressible; it cannot be crushed under any circumstances. Who he is, or what his family is, or where he works is immaterial to me. I love him whole heartedly. I do not know whether he loves me or not. He may not even be aware that there is someone who loves him so much. But my love for him is as firm as the Himalayas and as clear as waters of Manasarovar"
" Like Rohini to Chandra, like Lakshmi to Narayana, am I to him? Just as the creeper depends on a tree, I depend on him. I cannot live without him, and for his sake, I am ready to renounce everything. Let society say anything it wishes. I do not care."
(From Mahashweta written by Sudha Murthy)